प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलगना आधी रक्त गट का चेक कारतात ? ज़र रक्त गट सरख असलस परिणाम काय होतता

लगना आधी रक्त गट का चेक कारतात ? ज़र रक्त गट सरख असलस परिणाम काय होतता

1 उत्तर

दोन्ही जोडीदारांचे रक्तगट समान असल्याने मुल होत नाही हाच मुळात एक गैरसमज आहे. समान रक्तगट असणाऱ्या पालकांना मुल होण्यात काहीही अडचण येत नाही. दोघांचे रक्तगट समान असणे ही जर समस्याच नाही त्यामुळे अर्थातच उपायांचीही आवश्यकता नाही. रक्तगटासंबंधित एकमेव प्रश्न उद्भवू शकतो तो म्हणजे जर आईचा रक्तगट आरएच निगेटिव्ह (Rh negative) असेल आणि जर तीला आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर मात्र आईला पहिल्या बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर ४८ तासांच्या आत एक इंजेक्शन घ्यावे लागते. जर इंजेक्शन घेतले नाही तर आईला ऍन्टीबॉडीज म्हणजेच काही विशिष्ट प्रकारच्या री-अॅक्शन येऊ शकतात. तसेच जर तीला पुन्हा पुढच्या वेळी देखील आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर त्या बाळावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.

पुन्हा एकदा आवर्जून नमूद करावेसे वाटते की समान रक्तगट असणाऱ्या पालकांना मुल होण्यात काहीही अडचण येत नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 17 =