मुलाच्या लग्नाचं योग्य वय किती? मुलीच्या व मुलाच्या वयामध्ये किती फरक असायला हवा… जसं कि, मला 25-26 व्या वर्षी लग्न करायचं आहे. तर, मग मी.. वयाने माझ्यापेक्शा किती लहान मुलीशी लग्न करायला हवं.
आपल्याला माहीतच आहे की, कायद्यानुसार मुलीचे १८ व मुलाचे २१ असे लग्नाचे वय ठरविले आहे. ज्या वयात विवाहेच्छूक व्यक्ती लग्नाची जबाबदारी घेण्यास शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या तयार असेल ते लग्नासाठी योग्य वय. आता राहिला प्रश्न जोडीदारांच्या वयाच्या फरकाबद्दल.
समोरच्या व्यक्तीला तुम्ही जोडीदार म्हणून किंवा तुम्हाला समोरची व्यक्ती जोडीदार म्हणून इतर सर्व बाबतीत पूरक वाटत असेल तर फक्त वयाचा विचार करून निर्णय बदलण्याची गरज नाही. वयातील फरकामुळे समजून घेणे किंवा इतर काही गोष्टींमध्ये पुढे काही अडचणी निर्माण होतील याची काळजी करू नका. जसं मुलगा मुलीपेक्षा काही वर्षांनी मोठा असलेला चालतो तसंच मुलगीसुद्धा मुलापेक्षा काही वर्षांनी मोठी असेल तरी लग्न करायला काहीच हरकत नाही.
थोडक्यात काय तर वयातील फरकापेक्षा तुम्ही एकमेकांना पूरक आहात का, हे सर्वात महत्वाचे !
तुम्हाला तुमची जीवनसाथी मिळाल्यावर आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !