प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिंगात ताठरता कशी निर्माण होते

लिंगात ताठरता कशी निर्माण होते

1 उत्तर

पहिलं आपण हे समजून घेऊया की पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. जर यामुळे लैंगिक सुख अनुभवण्यास त्रास होत असेल तर त्याला आपण समस्या म्हणू शकतो यामुळे दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.  सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो होऊ शकतो. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. यासाठी सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल. अधिक माहितीसाठी  https://letstalksexuality.com/premature-ejaculation/ हा लेख तसेच आपल्या वेबसाईटवरील या समस्येसंबंधित प्रश्न उत्तरे नक्की वाचा.    
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.   
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर जरूर पाठवा.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 13 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी