लिंग उजव्या बाजूस वाकडं आहे की उजव्या बाजूला झुकलेलं आहे? तुमच्या प्रश्नामधून योग्य माहिती मिळत नाही. प्रश्न विचारताना विस्ताराना विचारला तर उत्तर लिहिताना आम्हाला जास्त सोप्प जाईल.
कदाचित पॉर्न क्लिप्स पाहिल्यानंतर असा संकोच वाटू शकतो. अनेकवेळा अशास्त्रीय पुस्तकांमधून खोटी किंवा चुकीची माहिती दिली जाऊ शकते. हे नेहमी लक्षात ठेवा पॉर्न क्लिप्स किंवा अशास्त्रीय पुस्तकांमध्ये लैंगिकतेच्या अतिरंजित कल्पना असतात. त्यात दाखवलेली दृष्य खोटी असू शकतात. प्रत्येकाच्या शरीरचं रंग, रुप किंवा स्वभाव वेगळा असू शकतो. म्हणजेच लैंगिक अवयवांचं रंग, रुप किंवा आकारदेखील वेगवेगळा असू शकतो. यात चुकीची किंवा संकोच वाटण्यासारखं काहीही नाही.
लिंगाला बाक असणं किंवा एका बाजूला झुकलेलं असणं नैसर्गिक आहे. यामुळं लैंगिक कृती करताना काहीही अडचण येत नाही. जर अशी अडचण आलीच तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा उगाच चिंता करण्याचं कारण नाही. सेक्स करण्याच्या भावनांवर नियंत्रण मिळवणं अवघड नाही. शिवाय हस्तमैथुन हा एक सुरक्षित उपाय आहेच.