पुरुषाच्या लैंगिक अवयावांसाठी लिंग, शिश्न, इंग्रजीमध्ये पेनिस हे देखील शब्द वापरले जातात. विशेष म्हणजे हे शब्द हिंसक पद्धतीने किंवा शिव्यांमध्ये वापरले जात नाहीत.
आता वळूयात तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे. मुळात लिंगाचा आकार का वाढवायचा ? सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा. आणि जोडीदार निवडताना बारीक/जाड हे न बघता एकमेकांची संमती, विश्वास, आदर आणि एकमेकांशी पूरक असणं जास्त महत्वाचं असतं.
प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ६ ते १३ सेंटीमीटर (३-४ इंच) लांब असतं तर ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. साधारणपणे लिंगाची लांबी १२ सेंटीमीटर असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. लिंग वाकडं असणं, तिरकं असणं, डाव्या किंवा उजव्या बाजुला झुकलेलं असणं हे सर्व अगदी ‘नॉर्मल’ आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/
आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक दिली आहे.
Ling motha karaycha aahe
Ling motha karaycha aahe