लिंगाचा आकार वाढविण्याचे शास्त्रीय कसोट्यांवर उतरलेले कोणतेही औषध अस्तित्वात नाही. मुळात लिंगाचा आकार का वाढवायचा यावरच विचार करण्याची गरज आहे. लिंगाचा आकार कमी म्हणजे लैंगिक सुख कमी मिळते किंवा गर्भधारणेमध्ये अडचण येते यांसारखे अनेक गैरसमज आपल्या समाजात आढळतात पण त्यात काहीच तथ्य नाही.
प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ६ ते १३ सेंटीमीटर (३-४ इंच) लांब असतं तर ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. साधारणपणे लिंगाची लांबी १२ सेंटीमीटर असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. लिंग वाकडं असणं, तिरकं असणं, डाव्या किंवा उजव्या बाजुला झुकलेलं असणं हे सर्व अगदी ‘नॉर्मल’ आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/
आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक दिली आहे.