तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? वयात आल्यावर लिंगाच्या टोकावरील शिस्नमुंडावरील त्वचा मागे पुढे होणे आवश्यक असते. हस्तमैथुन किंवा संभोग करताना लिंगावरील त्वचा मागे जाण्यात अडचण वाटत असेल अथवा दुखत असेल तर याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही किंवा लैंगिक सुख वाढतं असंही काही नाही.
तुमच्या प्रश्नावरून असं वाटतं आहे की तुम्ही लिंगावरील त्वचेच्या मागे न येण्याविषयी बोलत आहात. त्वचा मागे न राहण्याचं कारण ती खूप घट्ट किंवा लिंगाभोवती आवळलेली आहे असं तुम्ही म्हणताय. याबाबत योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त योग्य असेल.
अशाच प्रकारच्या आणखी एका प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खालील लिंकवर पहायला मिळेल..
https://letstalksexuality.com/question/जर-लंड-वरची-त्वचा-मागे-जात/
शीर तुटली तर काय करावे
जखम हाताने दाबून धरावी, रक्त येणे थांंबले की सोडून द्या. जखम भरुन येईपर्यंत लैंंगिक संबंध न केलेले उत्तम.