प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिगांवरची त्वचा खाली होत नाही. मला उपाय सांगा. पुर्ण पणे लिंगा वरती आहे
1 उत्तर

लिंगाच्या पुढील टोकास शिश्नमुंड असं म्हणतात. शिश्नमुडांवर त्वचेचा पातळ पडदा असतो. संभोगादरम्यान किंवा हाताने मागे ओढल्यास तो मागे येतो. हस्तमैथुन किंवा संभोग करताना शिश्नमुडांवरील त्वचा मागे न जाता काही त्रास होत नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही. लिंगाला ताठरता असताना ही त्वचा मागे न गेल्यामुळं त्रास होत असेल तर शस्त्रक्रिया करुन ही त्वचा काढून टाकता येते. याला सुंता करणं असं म्हणतात. यामुळं संभोगच्या कालावधी किंवा ताकदीमध्ये काहीही फरक पडत नाही. परंतू अशा शस्त्रक्रियेची प्रत्येकालाच गरज असेल असं अजिबात नाही. कारण वयात आल्यावर लिंगाला ताठरता येवू लागते या काळात सुरुवातीला ही त्वचा मागे जाताना त्रास होवू शकतो. परंतू कालांतराने हळूहळू मागे सरकताना त्रास होणं कमी होवून जातं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 17 =