नाही लिंग छोटे होत नाही मात्र लैंगिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. वयाच्या ४०- ४५ नंतर स्त्रियांमध्ये मेनोपॉज सुरु होतो. तसं पुरुषांमध्येही टेस्टोस्टेरॉन म्हणजे पुरुष संप्रेरक वयाच्या ५०- ५५ च्या पुढे कमी पडू लागते व पुरुषांचा ‘अॅन्ड्रोपॉज सुरु होतो. याकाळात स्नायूंचे आकारमान व ताकद कमी होणे, समागमात आवेग कमी होणे, लिंगामधील ताठरपणा कमी होणे, वीर्यपतन पूर्वीपेक्षा झटकन होणे, पोट सुटणे, व्यवहारातील जिगर, आग्रहीपणा कमी होणे असे काही बदल होऊ शकतात. हे सर्व होतंच असं नाही पण होऊ शकतं. या सगळ्याविषयी जोडीदाराशी मोकळेपणाने बोललात तर रिलीफ वाटेल. आणि तुमच्या मनातील न्यूनगंड लगेच गायब होईल.
2 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा