1 उत्तर
वर्ग जुळणं आणि घरामध्ये भांडण होणं याचा काहीच संबंध नाही. आपल्या समाजात जास्तीत जास्त लग्न ही गुण जुळवून पत्रिका बघून लावली जातात पण ज्या घरात भांडण नाही असं एक तरी घर आहे का? कोणत्याही नात्यामध्ये वाद होणं, भांडण होणं अगदी स्वाभाविक आहे. जिवंत असल्याचं एक लक्षणच आहे ते ! मुद्दा काय आहे, आपण ते वाद, भांडण कशाप्रकारे सोडवतो? भांडणामध्येदेखील समोरच्या व्यक्तीचा आदर राखतो का? पत्रिकेवरचे गुण जुळण्यापेक्षा परस्पर आदर, प्रेम, विश्वास आणि एकमेकांसाठी पूरक असणं जास्त महत्वाचं !
आपले उत्तर प्रविष्ट करा