प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवहिनीसोबत संबंध ठेवण्याची खुप इच्छा होते काय करु?
1 उत्तर

संभोग करणं ही मनाला आणि शरीराला आनंद देणारी लैंगिक कृती आहे. लैंगिक कृतीमध्ये समोरील व्यक्तीची समंती असणं गरजेचं असतं. अन्यथा तो बलात्कारच असतो. तुमच्या प्रश्नामधला महत्वाचा भाग हा आहे की, अशा नात्यामध्ये लैंगिक संबंध ठेवणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. कदाचित अशा लैंगिक संबंधामुळं नात्यांमध्ये जास्त गुंतागुंत होण्याची शक्यता असते. शिवाय तुमच्या या नात्याबद्दल इतरांना कळालं तर जे परिणाम होतील त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागेल. अनेकवेळा अशा नात्यांमुळं स्त्रियांची बदनामी पुरुषांच्या तुलनेत जास्त होते. तुम्हाला हे योग्य वाटतं का? महत्वाचं म्हणजे कायद्यानं दुसर्या व्यक्तीच्या पत्नीसोबत संभोग करणं गुन्हा आहे हे लक्षात असू द्या.

स्त्रियाकडं केवळ सेक्ससाठी पाहणं या दृष्टीकोनावर विचार करा. शिवाय तुम्ही जी भाषा वापरली आहे ती अधिक चांगली वापरू शकला असता. तुम्ही वापरलेली भाषा ही स्त्रियांच्या लैंगिक कृतींना हीन दाखवण्यासाठी वापरली जाते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 19 =