ही वेबसाइट लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागावा व्हावा म्हणून तयार करण्यात आली आहे. तुमच्या प्रश्नाचा उद्देश समजू शकला नाही. तरीही तुमच्या प्रश्नाविषयी बोलायचे झाल्यास…
१. हे ओळखण्यामागचा तुमचा हेतू काय आहे त्यावर विचार करा.
२. वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली किंवा महिला ओळखण्याचे कोणतीही लक्षणं नाहीत. कृपया तुम्हीही काही निर्देशांक लावून त्यांना जज न केललं किंवा लेबल न केललं अधिक चांगलं.
३. एखादी व्यक्ती वेश्या आहे किंवा नाही हे समजल्याने तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही फरक पडणार आहे का ? नसेल तर कशाला नसता खटाटोप.
४. आपल्या समाजात वेश्यांकडे एका विशिष्ट दृष्टीकोनातून पहिले जाते. त्यांना समाजात दुय्यम स्थान दिले जाते पण बऱ्याचदा त्यांनी हा व्यवसाय नाईलाजाने निवडलेला असतो. जरी त्यांनी स्वतःच्या इच्छेने निवडला असेल तरी तो त्यांचा निर्णय आहे आणि त्यावरून त्यांना जज न केलेलेच योग्य.
५. समाजाने ठरवून दिलेल्या चाकोरीबद्ध चौकटीत न राहणाऱ्या, स्वतंत्र, मोकळेपणाने राहणाऱ्या स्त्रियांना देखील आपल्या समाजामध्ये लेबलं लावण्याची पद्धत आहे. त्यात किती तथ्य असते यावर आपणच विचार करावा.
६. एवढे सगळे वाचूनही एखादी स्त्री/ मुलगी वेश्या आहे की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता असेलंच तर मी म्हणेन जाऊन विचारा आणि परिणामांना सामोरं जाण्याची तयारी देखील दाखवा.
He प्रशनाचे उत्तर नाहीं