एच. आय. व्ही असणाऱ्या व्यक्तीचे वीर्य मुखात आणि मुखावाटे पोटात गेले तर एच. आय. व्ही होण्याची शक्यता खूप कमी असते. लिंगाला जखमा असतील, लैंगिक आजार असेल, रक्त येत असेल किंवा तोंडामध्ये जखमा असतील रक्त असेल तर मात्र एच. आय. व्ही. चा विषाणू रक्तावाटे शरीरात जाण्याची शक्यता असते.
पण मुखमैथुनामुळे सिफिलीस सारखे इतर लैंगिक आजार पसरण्याची शक्यता असते. तसेच कावीळीसारखे इतर काही जीवाणू आणि विषाणू समोरच्या व्यक्तीच्या शरीरात जाऊ शकतात.
म्हणूनच एच.आय.व्ही.ची झालेल्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध (लिंग-योनी संभोग, मुखमैथुन आणि गुदमैथुन) ठेवत असताना कंडोमचा वापर करणे कधीही चांगले.
एच. आय. व्ही. विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर भेट द्या.