नमस्कार
माझ्या लिंगाभोवती अंडाशयावर गुदद्वारापयॆंत बुरशी आली आहे तेथिल भाग खुप खाजवत आहे त्रास होत आहे त्याचा संसर्ग पत्नीला होउ शकतो तरी बुरशी येण्याची कारणे व उपाय काय आहेत
माफ करा तुमच्या प्रश्नाला उत्तर उशिरा देत आहोत. बुराशी मागची कारणं अनेक आहेत. पण मुख्य आहे अस्वच्छता. बुरशी मुख्यतः दमट आणि उबदार जागी वाढते. पुरुषांच्या लिंगाभोवती जी त्वचा असते तिच्या खाली मुख्यतः बुरशी वाढू शकते. त्यामुळे आंघोळीच्या वेळी लिंगावरील त्वचा मागे घेवून त्या जागेची स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. लिंगाभोवती खाजवल्यामुळे त्वचेवर जे व्रण उठतात तिथेही बुरशी वाढू शकते. बुरशीचा आजार हा तसा लैंगिक संबंधातून पसरणारा आजार समजला जात नाही परंतु योनी प्रवेशी लैंगिक संबंधांतून तो पसरू शकतो. अस्वछतेसोबतच मधुमेह, प्रतिजैविकांचा वापर, साबण, श्याम्पू सारख्या गोष्टींचा अतिरेक अशी अनेक कारणं बुरशीच्या ह्या आजाराला कारणीभूत असू शकतात. खाजरे व्रण, जळजळ, सूज, त्वचा लाल होणे, अंगावरून जाणे आणि लघवीच्या किंवा संबंधांच्या वेळी वेदना अशी लक्षणं ह्या अजरात दिसतात.
बुरशी हा तसा सामान्य आजार आहे आणि त्यावर हमखास उपायही आहेत. डॉक्टर सुचवतील ती बुरशी विरोधी औषधे तुम्हला ह्य आजारातून बरी करू शकतात. परंतु लिंग आणि सभोवतीच्या त्वचेची योग्य आणि नियमित स्वच्छता आणि निगा तुम्हाला ह्या आजारापासून दूर ठेवू शकते.
अधिक माहितीसाठी खाली काही लिंक देत आहोत.
https://letstalksexuality.com/reproductive-tract-infections/