प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसारखे सेक्सचे विचार मनांत येतात

माझ वय २२ आहे,  माझ्या मनात सारखे  sex चे विचार येत असतात. माझा अभ्यास सुद्धा नीट होत नाही. काय कराव समजत नाही.

1 उत्तर

सेक्सचे विचार मनात येणं हे स्वाभाविक आहे. मनातल्या इतर भावनांप्रमाणेच सेक्सची किंवा लैंगिक भावना मनात निर्माण होते.
वयात येताना, तरुणपणी किंवा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर लैंगिक भावना मनात येऊ शकतात. त्या शमवण्यासाठी कुणी हस्तमैथुन करतं, कुणी जोडीदार असेल तर सेक्स करतं तर कुणी काही इतर प्रकारे सेक्सची भावना शमवतात. सतत सेक्सबद्दल बोलणं, फिल्म पाहणं, वाचणं या कृतीतूनही अशा इच्छा सतत मनात येऊ शकतात.
लैंगिक विचार व भावना अनावर होत असतील तर काही साधे उपाय करून पहा
अ) लैंगिक भावनांना उत्तेजित करणा-या कथा, कादंब-या, नाटकं (पोर्नोग्राफी) वाचण्याचं टाळलं पाहिजे. तसंच लैंगिक भावनांना खतपाणी घालून चेतवणारी चित्रं, चित्रपट, टी.व्ही. पाहणं प्रयत्नपूर्वक टाळलं पाहिजे.
आ) व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने, आपला व्यतिरिक्तचा वेळ स्वत:च्या आवडत्या कार्यात गुंतवला पाहिजे. उदा. छंद, स्पर्धा, खेळ, सामूहिक काम,सामाजिक काम, इ.
इ) आपला मित्रपरिवार निवडताना विचार केला पाहिजे. काही समवयस्क तरुण मंडळी ‘सेक्स’, व्यसनं, हिंसाचार यांत आनंद घेणारी असतात. त्यांच्या दबावाला आपण अगदी नकळत बळी पडू शकतो. अशा मित्रांच्या गटापासून दूर राहिलं पाहिजे.
ई) तरुण – तरुणींच्या संमिश्र गटामध्ये निकोप, खेळकर वातावरण असतं. सर्वांगीण विकास व्हायला असे गट उपयोगी ठरतात. एवढंच नव्हे तर निकोप व जबाबदार अशा सहजीवनाचा आनंद मिळतो व लैंगिक ताण कमी प्रमाणात जाणवतात, असा सर्वांचा अनुभवही आहे.
एक लक्षात घ्या. सेक्स किंवा लैंगिक भावना वाईट नाहीत. अनावर लैंगिक भावना मात्र वेळीच ओळखली पाहिजे, तिला आवर घातला पाहिजे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 0 =