प्रश्नोत्तरेसेक्स केल्याने पोट दुःखते का?

2 उत्तर

सेक्स केल्याने पोटात दुखते किंवा पहिल्यांदा सेक्स केल्याने वेदना होतात हा एक गैरसमज आहे. एखाद्या व्यक्तीला सेक्सविषयी चुकीची माहिती मिळाली की, ‘सेक्स म्हणजे वेदना’ असे समीकरण मनात रुजून बसते. विशेषतः मुलींच्या मनात ही भीती असू शकते. संभोगावेळी पाय आखडून धरल्याने भीतीपोटी जननेंद्रियाचे स्नायू आकुंचित झालेले असतात. आपल्याला आपल्या स्वतःच्या आणि एकमेकांच्या लैंगिक अवयवांची नीट माहिती असेल आणि फोर प्ले करून प्रेमाने, स्पर्शाने लैंगिकदृष्ट्या जोडीदार उद्दीपित झाल्यास वेदना होत नाहीत.

मनात भीती नाही, लैंगिक दृष्ट्या उत्तेजना पण आहे आणि तरीही पोटात दुखत असेल. किंवा नेहमी सेक्स केल्यावर पोटात दुखत नाही आणि अचानक दुखायला लागल्यास योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 5 =