प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्स केल्या वर 10 दिवसांनी पाळी अली पण नंतर महिना होऊन गर्ल तरी पाळी अली नाही

सेक्स कारत्या वेळीकोंडम वापरला होता त्या नंतर 10 दिवसांनी तिला पाळी येऊन गेलीपरंतु पाळी येऊन गेल्या नंतर सेक्स केला नाही व तिला महिना होऊन गेला तरि पाळी आली नाही काय कारण असेल

1 उत्तर

काही मुलींची पाळी 21 – 22 दिवसांनी येते तर काहींना दोन-दोन महिने पाळी येत नाही. कधी कधी आजारपणात पाळी पुढे ढकलली जाते तर कधी प्रवासामुळे दगदग होऊन पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येते. प्रत्येकीचं पाळीचं चक्र जसं वेगळं असतं तसंच दोन पाळी चक्रांमध्ये पण फरक पडू शकतो. पाळीचक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्वाची घटना असते. एकदा का बीज बीजकोषातून बाहेर आलं आणि गर्भधारणा झाली नाही तर त्यानंतर साधारणपणे 12-16 दिवसांनी पाळी सुरू होते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधीचा काळ मात्र निश्चित असतोच असं नाही. तो बदलू शकतो. प्रवास, मानसिक ताण, औषधोपचार अशा विविध कारणांमुळे हा काळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र अंडोत्सर्जन झाल्यानंतर मात्र 16 दिवसात पाळी येते.

तुमच्या बाबतीत घाबरण्याचे काही कारण दिसत नाही. गर्भधारणा झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रेग्नसी टेस्ट करा. मेडिकलमध्ये प्रेग्नसी टेस्टचे कीट मिळते त्याचा उपयोग करून तुम्हाला गर्भधारणा आहे की नाही हे पाहता येईल. थोडे दिवस पाळीची वाट बघा.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक पाहा.

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/

https://letstalksexuality.com/category/our-bodies/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 0 =