प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहनिमून : माझं लग्न काही दिवसातच होणार आहे आणि हनिमूनला गेल्यावर आम्हाला बिना कोंडोम सेक्स करण्याचा आनंद घ्यायचा आहे. माझा प्रश्न असा आहे की, असा सेक्स केल्यानंतर गर्भधारणा होऊ नये यासाठी आम्हाला ३-४ पर्याय सुचवा.

माझं लग्न काही दिवसातच होणार आहे आणि हनिमूनला गेल्यावर आम्हाला बिना कोंडोम सेक्स करण्याचा आनंद घ्यायचा आहे. माझा प्रश्न असा आहे की, असा सेक्स केल्यानंतर गर्भधारणा होऊ नये यासाठी आम्हाला ३-४ पर्याय सुचवा.

1 उत्तर
Answer for हनिमून answered 6 years ago

निरोध न वापरता सेक्स केल्यानंतर गर्भधारणा होऊ नये यासाठी अचूक असा कुठलाच पर्याय नाही.

पण गर्भनिरोधनाचे काही मार्ग आहेत, त्यासाठी https://letstalksexuality.com/contraception/ ही लिंक पहा.

काही लोक विर्यपतन योनीत न करता, ते योनीच्या बाहेर करतात जेणेकरुन गर्भधारणा होणार नाही असा हेतू असतो. पण हाही मार्ग पूर्णपणे अचूक नाही आहे. यामध्ये ही गर्भधारणा होण्याची शक्यता असतेच.

मासिक पाळीच्या चक्रामधल्या काही दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. प्रत्येक स्त्रीसाठी पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. साधारणपणे पुढची पाळी येण्याच्या आधी 2 आठवड्याच्या सुमारास अंडोत्सर्जन होते. म्हणजेच स्त्रीच्या बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येते आणि बीजवाहिनीमध्ये 12-24 तास जिवंत राहते. या काळात जर पुरुष बीजाशी त्याचा संपर्क झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. तेव्हा हे दिवस टाळून जाता आले तर पहा. पण यामध्ये ही 100% गर्भधारणा टाळता येत नाहीच.

याविषयी अधिक माहिती खालील लेखामध्ये दिली आहे ते वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/conception/

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 11 =