हस्थमैथुन asked 9 years ago

मला हस्थमैथुनची जास्त सवय झाली आहे काही तरी उपाय सुचवा

jeet replied 9 years ago

jast mulina kiss kel tr kahi hot nahi na

I सोच replied 8 years ago

फक्त किस केल्याने किंवा चुंबन घेतल्याने काही लैंगिक आजार किंवा एच. आय. व्ही होत नाही. मात्र किस करताना देखिल संमती, आदर, विश्वास या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत जितक्या त्या सेक्स करताना महत्वाच्या असतात…

एच. आय. व्ही असणाऱ्या व्यक्तीला किस केल्याने देखील लैंगिक आजार होण्याचा धोका नाही. मात्र, एच. आय. व्ही बाधित व्यक्ती व तिचे चुंबन घेणारी व्यक्ती दोघांच्याही ओठांना अथवा तोंडात जखम असेल व किस करताना अथवा चुंबन घेताना रक्ताशी संपर्क आला तर एच. आय. व्ही ची लागण होऊ शकते. नाही. किस केल्याने लैंगिक आजार होण्याचा धोका नाही. मात्र यापुढे जाऊन लैंगिक संबंध येणार असतील तर कंडोम वापरा.

1 उत्तर

हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे.  हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक निरोगी नसतो. हस्तमैथुन केल्याशिवाय किंवा दुसऱ्या कशानेच आनंद मिळत नाही अशी स्थिती येणे योग्य नाही. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा. वाचन करा, जर आपण विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करा, खेळांमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करा. असं दिसून आलं आहे की ज्या व्यक्ती एकाकी आणि दुःखी असतात त्या जास्त प्रमाणावर हस्तमैथुन करतात. तुमच्या बाबत असं काही होत आहे का याकडे लक्ष द्या. एकाकीपणा घालवण्यासाठी बाहेर पडणं, इतरांना भेटणं, गरजेचं आहे. दुःखाचं कारण शोधायचा प्रयत्न केलात तर त्यावरही काही मार्ग काढता येतील. वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 20 =