प्रश्नोत्तरेCategory: Public Questions21 वर्षिय पुरुषाचे बिजकोश लहान असले तरी एका काळजाच्या ठोक्याला 1000 पुरुषबिज तयार होतात का ?

1 उत्तर

बीजकोश लहान आहेत की मोठे, पुरेसे आहेत की अपुरे ही तुलना आपण न करता ते डॉक्टरांना ठरवू द्या. बीजकोश लहान किंवा मोठे असल्याने पुरुष बीज निर्मितीत तसा फरक पडत नाही. पुरुष बीज पुरेशा प्रमाणात तयार होतात की नाही हे महत्वाचे. पण तेही प्रयोगशाळेत परीक्षण केल्यानंतरच ठरवता येते. पुरुषबीज पुरेशा प्रमाणात तयार न होण्याला अनेक कारणं असतात. उदा- हार्मोन्स मधील असंतुलन, तान-तणाव, व्यसनाधीनता ई. तुम्हाला आपल्या बिजकोशांची काळजी वाटत असेल किंवा सातत्याने तेच विचार मनात येत असतील तर आपल्या डॉक्टरांना जरूर भेटा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 12 =