10 जुलै ला पाळी येणार होती पण ती आली नाही, आम्ही 15 आणि 20 जुलै ला प्रेग्नन्सी किट वापरून युरीन टेस्ट केली तर त्या वेळी आम्हाला एक लाईन डार्क आणि एक लाईन फिकट दिसत होती, व 19 जुलै पासून योनीमार्गातून थोडा थोडा रक्तस्त्राव होत होता, आणि 23 जुलै ला रक्ताचे गुठले योनीमार्गातून पडले, त्या नंतर हळू हळू रक्त स्त्राव हिअत होत आहे. तरी प्रेग्नन्सी असू शकते का? आणि हे कशामुळे होत असेल
तुम्ही सांगताय त्या नुसार जर प्रेग्नंसी किटवर दोन लाइन दिसत असतील तर प्रेग्नंसी असण्याची शक्यता असू शकते. पण जर रक्तस्त्राव होत असेल तर लवकरात लवकर तुम्ही स्त्रीरोगतज्ञांना/Gynecologist ला भेटून तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.
गर्भधारणेबाबत अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.