प्रश्नोत्तरेमला अनियमित पाळी येते म्हणजे महिना पूर्ण होण्याआधीच ५-७ दिवस आधी पाळी येते आणि अंगावर १ दिवस जाते दुसऱ्या दिवशी थोडं जाते आणि तिसऱ्या दिवशी काहीच नसते , अंग खूप दुखते अस का होत असेल आणि माझी ही समस्या 5५-६ महिन्यापासून आहे तर अंगावर थोडं जाण्याची समस्या मी वयात आले तेंव्हापासूनची आहे .

2 उत्तर

काळजी करण्याचे काहीच कारण नाही. हे अगदी नैसर्गिक आहे त्यामुळे अगदी निश्चिंत राहा.

प्रत्येकीचं पाळी चक्र वेगवेगळं असतं. हे २२ ते ३४ दिवसांचं असू शकतं. तुमचं पाळीचक्र २४ ते २५ दिवसांचं आहे असं दिसतंय. यात काळजी करण्यासारखे काहीच नाही.

पाळीच्या काळात साधारणपणे २ ते ४ चमचे म्हणजेच ३० ते ६० मिलीलीटर रक्त जातं. ३ ते ७ दिवस रक्तस्राव होतो पण यात काळजी करण्यासारखं काहीच नाही.

काहीजणींना पाळीच्या काळात ओटीपोटात दुखणे, कंबर दुखणे किंवा पाय दुखणे यांसारखा त्रास होतो. चालणे किंवा एखादा दुसरा हलका व्यायाम केला तर स्नायूंना आराम मिळतो. वेदना थांबवण्यासाठी शेकही घेऊ शकता. पाळीतील वेदना सहन न करता त्यावर काही उपाय करायला हवा. खालील काही घरगुती उपाय करता येतील.

गरम पाण्याची पिशवी कमरेखाली घ्यावी.

आले घालून चहा प्यावा. एक कप चहात अंगठ्याएवढे आले घालावे.

चिंचोक्याइतका चुना व त्यात दुप्पट गूळ घालून गोळी तुपातून किंवा ताकातून घ्यावी.

बऱ्याच वेळा बद्धकोष्ठतेमुळे पोटात दुखू शकते. त्यासाठी पाळीच्या आधी भरपूर पाणी व तंतुमय पदार्थांचा उपयोग करून बद्धकोष्ठता टाळावी.

घरगुती उपायांनी जर आराम पडला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. फक्त पोटात दुखतंय किंवा कंबर दुखतेय असं सांगून औषध घेतलं तर कदाचित त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे पाळीच्या काळात किंवा पाळी आल्यामुळे वेदना होत आहेत हे खरं कारण मोकळेपणाने डॉक्टरांना सांगा.

आपल्या वेबसाईटवर पाळीविषयीचे अनेक लेख आणि प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत ते नक्की वाचा.

https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/

https://letstalksexuality.com/category/our-bodies/

खालील लिंकवरील व्हिडीओ पाहा.

https://www.youtube.com/watch?v=jiNArN_L9nU&t=3s

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 12 =