सर्वप्रथम तुमचे एका गोष्टीवर तुमचे लक्ष वेधावेसे वाटते. स्त्री पुरुष यांच्या मिलनाला किंवा लैंगिक दृष्ट्या एकत्र येण्याला सेक्स, संभोग, लैंगिक संबंध किंवा शरीर संबंध; स्त्रीच्या लैंगिक अवयवाला ’योनी’ आणि पुरुषांच्या लैंगिक अवयवांना ‘लिंग आणि वृषण’ असे अधिक योग्य आणि सोपे, सुटसुटीत शब्द उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे त्यांचा शिव्यांमध्ये किंवा हीन अर्थी वापर सहसा केला जात नाही. तुम्हाला संभोग करण्याची इच्छा आहे पण जोडीदाराला विचारायला भिती वाटत असेल तर वेळ घ्या, घाई करु नका. ज्यावेळी तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला संभोग करण्यासाठी सुरक्षित आणि कंफर्टेबल वाटेल त्यावेळी योग्य तो निर्णय घ्या. एखाद्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवताना त्या नात्यातील प्रेम, विश्वास, आदर, संमती आणि पारदर्शकता महत्वाची आहे. लैंगिक संबंध ठेवताना दोघेही सज्ञान आहेत का? दोघांचीही ठेवढीच इच्छा, ओढ आणि संमती आहे का? लैंगिक संबंध सुरक्षित आहेत का हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. फसवणूक करून, खोटं बोलून, जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.
अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करुन ‘सेक्स बोले तो’ हा सेक्शन आवर्जून वाचा.
https://letstalksexuality.com/category/talking-about-sex/
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा