शरीर विक्रय करणाऱ्या जशा स्त्रिया असतात तसेच पुरुषही असतात. तसेच समलिंगी व्यक्तींसाठीही ही सेवा उपलब्ध आहे. परंतु मजा, माहिती, उत्सुकता म्हणून शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांकडे किंवा पुरुषांकडेच जावे हा काही एकमेव पर्याय नाही. १८ वर्षे आणि अधिक वय असलेल्या व्यक्तींना खरे तर आपल्या इच्छेने आणि संमतीने लैंगिक नाते संबंध निर्माण करण्याचा अधिकार आपल्या कायद्याने आणि पर्यायाने राज्यघटनेनेच दिला आहे. तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. मुलींनाही भावना आहेत. त्या व्यक्त करण्याचा, गोष्टी जाणून घेण्याचा, उत्सुकता शमविण्याचा आणि आनंद सुरक्षितपणे उपभोगण्याचा अधिकार त्यांनाही आहे. पण आपल्या समाजात तो मुलांना जसा सहज मिळतो तसा मुलींना मिळत नाही. हे सुद्धा खरे आहे.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा