ABOUT GIRL BODY LANGUAGE

281
GAURAV SHEWALE asked 2 weeks ago

ak prashna pdlay aani sarvikde tya babtit khup charcha asete munun mi to vichartoy-  as mntat ki avivahit mulina kiva mulinni sex kela ki tyacnchi body khulte, tyache stan vadtat ani purn body lach vegla aakar milto..he khar ahe ka, ani asel tr ka hot? ani last mulgine sex kela ahe he kas olkhav?

1 Answers
let's talk sexuality answered 2 weeks ago

या सारख्या प्रश्नां मागे काहीही शास्त्रीय आधार नसतो. जेव्हा पाळी चालू होते तेव्हा वेगवेगळ्या संप्रेरकांमुळे शरीराला गोलाई येणे, अवयवांची पूर्ण वाढ होणे व इतर गोष्टी चालू होतात. त्याचा व लैंगिक संबंधांचा काहीही संबंध नसतो जे तु विचारतोय असं असतं तर मग ज्या मुलींचे लैंगिक संबंध आलेच नाहीत त्या मुलीच्या शरीराला ‘तो’ वेगळा आकार (खुलणं) आलाच नसता नाही का?

मुलीने सेक्स केला आहे की नाही हे आपल्याला तिने सांगितल्या शिवाय कसं कळणार? असं पाहून तरी कळत नाही. ते समजून घेण्याची गरज का भासते याबद्दल ही विचार व्हायला हवा.

ब-याच प्रमाणात असे गैरसमज समाजात असतात की,मुलीचे शरीर, स्तन यांचा आकार मोठा असल्यास, चालण्याची लकब बदलली की तिचे संबंध आले असतील म्हणुन… पण त्यात काही तथ्य नाही. वाढत्या वयात शरीरात बदल हे होणारच … फक्त काहींच्या बाबतीत लवकर काहींच्या उशीरा… एवढंच.