प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसर माझी गर्लफ्रेंड चे लग्ने झाले आहे

सर माझी गर्लफ्रेंड चे लग्ने झाले आहे आणि तिच्यात व तिच्या नावऱ्यामध्ये एकदा सेक्स झाला आहे.तिची अशी इचछा आहेकी तिला माझ्यापासून मूल व्हावे.जर आम्ही सेक्स केला तर काही धोका येऊ शकतो का म्हणजे एड्स ?

1 उत्तर

तुमच्या “मी ‘एक्स’ व्यक्तीशी संबंध ठेवला तर आजार होईल का ?” या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास…तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत सेक्स करायचा आहे त्या व्यक्तीला जर लैंगिक संबंधांतून पसरणारा आजार असेल तर तुम्हालाही आजार होऊ शकतो. लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजाराविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/category/sexual-health/.

तुमचा प्रश्न “मी ‘एक्स’ व्यक्तीशी संबंध ठेवला तर आजार होईल का ?” एवढ्यापुरता मर्यादित नसून त्याला अनेक भावनिक आणि सामाजिक पैलू आहेत त्याचा तुम्ही विचार करावा असे वाटते.

१.उघड आहे तुमचे हे संबंध तुम्ही जगासमोर स्वीकारण्याच्या स्थितीत नसणार आहात. ते लपवावे लागतील. कारण आपल्या समाजात ते स्वीकारले जाण्याची शक्यता नाही. असे संबध जर उघडकीस आले तर त्यातून तयार होणाऱ्या अडचणींना/ गुंतागुंतीला सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे का? त्यावेळी दोघांची एकमेकांना साथ असेल का? निर्णय काहीही घ्या पण त्याच्या परिणामांची जाणीव ठेवा आणि जबाबदारीही घ्या. त्यापासून पळून जाऊ नका किंवा माझा काही संबंध नाही असं नंतर म्हणू नका. कारण बहुतेक वेळेस पुरुषासाठी हे सोपं असू शकतं, बाईसाठी नाही…

२. या लैंगिक संबंधांमुळे तुमच्या मैत्रिणीच्या वैवाहिक नात्यामध्ये गुंतागुंत वाढू शकते.

३. दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 0 =