प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsAids vishayi mahiti: Gharamadhe Aids zaleli vyakti asel tar tichya sahavasatun kahi dhoka ahe ka? tya vyaktine vaprelele toilet bathroom apn vaparale tar kahi dhoka ahe ka?
1 उत्तर
Answer for Aids vishayi mahiti answered 8 years ago

काहीही धोका नाही. गर्भधारणा झालेल्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला एच.आय.व्ही./एड्सची लागण झाली असेल तर त्याच्या सहवासातून किंवा त्यानं वापरलेल्या बाथरुम मुळं एच.आय.व्ही. होण्याचा धोका नसतो.

शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो.

एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे

निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,

दूषित रक्त आणि

प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 7 =