एकाच वेळी दोन व्यक्तींसोबत सेक्स केल्यावर एच. आय. व्ही. होतो की नाही याविषयी यात आपण बोलूच पण एकापेक्षा अनेक व्यक्तींशी संबंध ठेवत असताना तुम्ही खालील काही गोष्टींचा विचार करावा असे वाटते.
१. तुम्ही समोरच्या व्यक्तींची इच्छा, संमती, सुरक्षितता लक्षात घेत आहात का ? इच्छेविरुद्ध केलेला लैंगिक संबंध हा कायद्याने गुन्हा आहे.
२. तुम्ही कोणाची फसवणूक तर करत नाही ना ? नात्यामध्ये पारदर्शकता असणे कधीही चांगले.
तुमच्या “मी ‘एक्स’ व्यक्तीशी संबंध ठेवला तर एड्स होईल का ?” या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास…तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत/व्यक्तींसोबत सेक्स करायचा आहे त्या व्यक्तीला जर एड्स किंवा लैंगिक संबंधांतून पसरणारा आजार असेल तर तुम्हालाही आजार होऊ शकतो. लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजाराविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/category/sexual-health/.
एच. आय. व्ही./ एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/hiv_aids/
आपल्या वेबसाईटवर एच. आय. व्ही./ एड्स विषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ती ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/