प्रश्नोत्तरेCategory: Public Questionssex kartana jar condom phatla tar emergency madhe kay karvave

sex kartana jar condom phatla tar emergency madhai kai karva jaymulai kahi problem yenar nhi konti golya vapravat ani kadi ani tundai jolyna english madhai ky manatat ani ky navanai miltat medical madhai

1 उत्तर
Answer for angel answered 9 years ago

कंडोम जर चुकीच्या पद्धतीने लावला गेला असेल तर फाटण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे कंडोमच्या पाकिटावर त्याच्या वापरासंबंधी सूचना लिहिलेल्या असतात त्या पाळल्या तर कंडोम फाटण्याची शक्यता कमी होते. स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजे जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात जर गर्भनिरोधक न वापरता जर लैंगिक संबंध केले असतील किंवा निरोध वापरूनही तो फाटला किंवा फेल गेला तर गर्भधारणेची शक्यता असते. अशा वेळी असे संबंध आल्यानंतर 72 तासाच्या आत जर या गोळ्या घेतल्या तर गर्भधारणा रोखता येऊ शकते. यांना मॉर्निंग आफ्टर पिल्स असंही म्हणतात. मात्र यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. नियमित गर्भनिरोधक म्हणून याचा उपयोग करणं चांगलं नाही. मेडिकल मध्ये या गोळ्या i pill या नावाने मिळतात. स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळ ओळखण्यासाठी या लिंक वरील लेख नक्की वाचा.

गर्भधारणा नक्की कशी होते?

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 9 =