Sex kartana condom brake zala te kase olkich ani brake zaylayvar ky karve emergency madhai konti goli khavi
कंडोम जर चुकीच्या पद्धतीने लावला गेला असेल तर फाटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कंडोमच्या पाकिटावर त्याच्या वापरासंबंधी सूचना लिहिलेल्या असतात त्या पाळल्या तर कंडोम फाटण्याची शक्यता कमी होते. सेक्स करताना जर कंडोम फाटला तर फाटल्याचा आवाज येतो व कंडोम फाटला असल्याचे लक्षात येते. स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजे जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात जर गर्भनिरोधक न वापरता जर लैंगिक संबंध केले असतील किंवा निरोध वापरूनही तो फाटला किंवा फेल गेला तर गर्भधारणेची शक्यता असते. अशा वेळी असे संबंध आल्यानंतर 72 तासाच्या आत जर या गोळ्या घेतल्या तर गर्भधारणा रोखता येऊ शकते. यांना मॉर्निंग आफ्टर पिल्स असंही म्हणतात. मात्र यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. नियमित गर्भनिरोधक म्हणून याचा उपयोग करणं चांगलं नाही. मेडिकल मध्ये या गोळ्या i pill या नावाने मिळतात. आपण हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे की नको असणारी गर्भधारणा टाळणं ही फक्त एकट्या स्त्रीची जबाबदारी नसून ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळ ओळखण्यासाठी आणि या लिंक वरील लेख नक्की वाचा.
https://letstalksexuality.com/conception/
https://letstalksexuality.com/contraception/