प्रश्नोत्तरेमूलगा कसा होत

1 उत्तर

मुलगाच का हवा? मुलगी का नको ? याबद्दल सर्वप्रथम विचार करण्याची गरज आहे. पुरुषप्रधान भारतीय समाजात वर्षानुवर्षे स्त्रियांचं स्थान हे दुय्यम राहिलं आहे. लिंगनिवड करून फक्त मुलांनाच जन्माला घालण्याच्या मानसिकतेमुळे मुलींचे प्रमाण कमी कमी होत आहे. ही सर्वांसाठीच एक धोक्याची घंटा आहे.

शास्त्रीयदृष्ट्या सांगायचे झाले तर स्त्रीकडे XX तर पुरुषाकडे XY ही गुणसूत्र असतात. पुरुषाकडून Y आणि स्त्रीकडून X गुणसूत्र आले की मुलगा होतो. पुरुषाने गर्भधारणेवेळी कोणते गुणसूत्र पाठवायचे हे खरंतर पुरुषालाही ठरवता येत नाही. स्त्रीने ठरविण्याचा तर प्रश्नच येत नाही.

मुलगा जन्माला येण्यासाठी प्राधान्य देणं आणि स्त्रीचा जन्मच नाकारणं हा स्त्रियांवर होणारा अन्याय आहे आणि आपण त्याला विरोधच केला पाहिजे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/pcpndt/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 3 =