तुम्ही ज्या जोडीदारासोबत समागम(संभोग/सेक्स) करता त्याच्याबद्दल आदर असणं महत्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही समोरील जोडीदाराला केवळ संभोग(सेक्स) करण्याची वस्तू समजता त्यावेळी तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला लैंगिक सुख कितपत मिळेल यावर शंका आहे. सहजीवन, समागम, सेक्स, संभोग यांसारखे अनेक योग्य शब्द आपल्याला वापरता येतील. आपल्या बोलण्यातून आपण कोणाचा अनादर तर करत नाही ना? आपल्या समाजात वापरल्या जाणाऱ्या अनेक शब्दांमधून स्त्रियांवर हिंसा होत असते. तुम्हाला नक्की काय विचारायचे आहे ते पुन्हा एकदा योग्य शब्दांत विचारलेत तर आम्हालाही उत्तर देताना चांगले वाटेल. आपल्या वेबसाईटवर लैंगिकतेच्या अनेक पैलूंविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा.
‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/