प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsbody vril hairs cha mc shi sambndh ahe kaa

majhy gf chya payanvr khup. kes ahet pn ti mhnte ki lahanpnapasunch ahet. ani tila kdhich regular time la mc yet nhi. ani jri ali tri tila khup trass hoto..so ya 2 goshtincha khi sambndh ahe ka???

asel tr upay sanga plz….

1 उत्तर

शरीरावरील केस, पाळीतील अनियमितता, पाळीतील त्रास, वजन वाढणे, मुलीच्या आवाजात बदल होणे या सर्व गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. हार्मोन्स म्हणजे संप्रेरकं, त्यातील असंतुलन याचा मुलींच्या पाळीवर, शरीरातील अनेक प्रक्रियांवर परिणाम होतो. पीसीओडी नावाचा एक प्रकारचा गर्भाशय आणि बिजाकोशाशी संबंधित आजार आहे. ज्यात अशी अनेक लक्षण मुलींमध्ये वाढत्या वयातच दिसतात. स्त्री रोग तज्ञांना भेटणे, योग्य वैद्यकीय उपचार घेणे हेच उपाय यावर आहेत. तुमच्या मैत्रिणीच्या बाबतीत काय स्थिती आहे हे आम्ही कदाचित सांगू शकणार नाही. डॉक्टरांचा सल्ला घेणेच उत्तम.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 6 =