प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझे स्तन खुप लहान आहे असे मला वाटते त्या साठी काही उपाय आहे का ?

2 उत्तर

स्तन लहान असतील तरी काळजी करण्याचे किंवा तुमच्यात काहीतरी कमी आहे असं समजण्याचे कारण नाही. स्तन सुडौल करणारी किंवा वाढवता येणारी कोणतीही शास्त्रीय कसोट्यांवर उतरलेली वैद्यकीय औषधं उपलब्ध नाहीत.

प्रत्येक व्यक्तीनुरुप शरीररचना वेगवेगळी असू शकते. अगदी जुळी मुलं देखील स्वभाव आणि शरीराने एकसारखी नसतात. त्याचप्रमाणे, प्रत्येक मुलीचे, स्त्रीचे स्तन देखील वेगवेगळ्या आकाराचे असतात. प्रत्येकाच्या प्रकृती आणि वयानुसार लहान, मोठे, सैल अथवा घट्ट असू शकतात . महत्वाचं म्हणजे स्तन मोठे असावेत की छोटे, सैल असावेत की घट्ट असा काहीही मापदंड नाही. बाळाच्या पोषणासाठी निसर्गतः स्त्रीच्या स्तनांमध्ये बाळंतपणानंतर दुध तयार होते. स्तनांचा आकार आणि दुध तयार होणे याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

समाजामध्ये स्तनांच्या आकाराविषयी अनेक गैरसमज आढळतात. स्तनांचा आकार आणि सौंदर्य किंवा लैंगिक समाधान याच्याशी लावला जातो. पण यात काहीही तथ्य नाही. हे जाणीवपूर्वक पसरवले गेलेले गैरसमज आहेत. स्तनांच्या आकारावर लैंगिक क्रियेतील आपली रुची, आवड किंवा लैंगिक सुख देण्या-घेण्याची क्षमता अवलंबून नसते. स्तन फार संवेदनशील असतात, हलक्या स्वरूपाच्या स्पर्शानेही ते उत्तेजित होतात. चिञपट किंवा मालिकांमधून देखील स्त्रिया या उपभोगाच्या वस्तू आहेत त्यांनी आकर्षक दिसलंच पाहिेजे असा आभास निर्माण केला जातो. तसेच काही मार्केट धार्जिणे लोक स्तन सुडौल करण्यासाठी उपाय आहेत असा दावा करून त्यांची उत्पादने खपवत असतात. माध्यमांनी दिलेल्या साईजमध्ये जे बसत नाही त्यांना न्यूनगंड आणि जे बसतात त्यांना अहंकार येतो. खरतरं वयानुसार स्तनांचा आकार बदलत राहतो. अनेकवेळा दोन्ही स्तन देखील एकसारखे नसतात. त्यात फिकीर करण्याचं काही कारण नाही. चुकीच्या सौंदर्याच्या कल्पनांना नक्कीच छेद देता येवू शकतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 20 =