काहीवेळ बाळंतपणामध्ये अडथळा तयार होतो आणि सिझर करावे लागते. खालील काही परिस्थितींमध्ये सिझेरियन करावे लागते.
• बाळंतकळा सुरु होऊन २४ तासांपेक्षाही जास्त वेळ झाला आहे पण योनीमार्ग अजूनही उघडलेला नाही.
• गर्भाची हालचाल मंदावली आहे.
• नाळ योनीमार्गात उतरली आहे.
• अंगावरून जास्त रक्त जायला लागल्यास
• बाळाची पाठ किंवा हात दिसू लागल्यास
• स्त्रीचा रक्तदाब (ब्लड प्रेशर) जास्त वाढल्यास
• एकापेक्षा जास्त गर्भ असल्यास
• बाळ गुदमरू लागल्यास
• बाळाचे ठोके प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी होऊ लागल्यास
वरील परिस्थितीत सिझेरियन करावे लागते. इतर वेळी सिझर करण्याची गरज नसते. डॉक्टरांनी सिझेरियनचा सल्ला दिल्यास त्यांना त्यामागचे कारण विचारून मगच निर्णय घ्या. गरज असल्यास सरकारी दवाखान्यात कमी खर्चात सिझेरियनची शस्त्रक्रिया होऊ शकते. अनेकदा गरज नसताना पैसे जास्त मिळत असल्यामुळे सिझर केलं जातं. अशावेळी आपण लुटारू दवाखाने आणि डॉक्टर यांच्यापासून सावध राहिले पाहिजे.