लैंगिक संबंध दोन्ही जोडीदारांच्या दृष्टीने अधिक आनंददायी होण्यासाठी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. दोघेही उत्तेजित झाल्यानंतर केलेला संभोग अधिक आनंददायी होतो. प्रत्येक व्यक्तीचे काही ‘इरॉटिक पॉइंटस’ असतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळत असतं. अशा शरीराच्या अवयवांना स्पर्श केला पाहिजे. याला प्रणय किंवा ‘फोरप्ले’ म्हणतात. स्त्रीला लैंगिक सुखाचा परमोच्च बिंदू अनुभवण्यासाठी ‘फोरप्ले’मध्ये शिस्निका म्हणजेच Clitoris चा वापर महत्त्वाचा आहे. शिस्निकेला कुरवाळल्याने, स्पर्श केल्याने, स्त्रीला उत्तेजित होण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही तुमच्या जोडीदाराशीही याविषयी संवाद करणे गरजेचे आहे. जोडीदाराला कोणत्या कृतीतून जास्त आनंद मिळतो हे संवादातूनच समजू शकते.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा