प्रश्नोत्तरेCategory: Public Questions1वर्ष मुल नको आहे

1 उत्तर

मुल नको असेल/गर्भधारणा नको असेल तर त्यासाठी काही साधनं किंवा पद्धती वापरता येतात. यांना गर्भनिरोधकं असं म्हणतात. पुरुषांनी वापरायचा निरोध किंवा कंडोम हे सर्वात सुरक्षित गर्भनिरोधक आहे. याशिवाय तोंडावाटे घेण्याच्या संप्रेरक गोळ्या, योनिमार्गात ठेवायच्या शुक्राणूनाशक गोळ्या, तांबी किंवा कॉपर टी इ. गर्भनिरोधके वापरता येतील 
इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नको असणारी गर्भधारणा टाळणं ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. पण प्रत्यक्षात मात्र गर्भनिरोधक वापरण्याची सगळी जबाबदारी स्त्रीवरच टाकलेली दिसते. खरं तर पाळी चक्रातले काहीच दिवस स्त्री जननक्षम असते किंवा गर्भ धारणा होऊ शकते. पुरुषाच्या शरीरात मात्र रोज लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं तयार होत असतात आणि प्रत्येक वेळी वीर्यामध्ये पुरुषबीजं असतात. तसंच निरोध ही सर्वात सुरक्षित आणि निर्धोक गर्भनिरोधक पद्धत आहे. त्यामुळे लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील  ‘ नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी’ हा लेख जरूर वाचा.
https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 4 =