लग्नानंतर लगेच संभोग करण्याआधी कुटूंब नियोजना साठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे का, आपल्या माहिती नुसार गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्या
कुटुंब नियोजनाचा किंवा गर्भनिरोधक वापरण्याबाबतचा सल्ला लग्नाआधी किंवा लैंगिक संबंध सुरू होण्याआधी घेतलेला कधीही चांगला असतो. गोळ्या घेण्यासंबंधीची माहिती आम्ही दिली आहे. मात्र गोळ्यांचा काही त्रास होणार नाही ना हे डॉक्टरांना भेटून त्यांच्याशी चर्चा करूनच ठरवायला पाहिजे. काही आजारांमध्ये गोळ्या घेणं शरीरासाठी अपायकारक ठरू शकतं. त्यामुळे वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा आहे.
डॉक्टर उपलब्ध नसतील तर एक-दोन महिने दिलेल्या सूचनांनुसार गोळ्या घेतल्या तर हरकत नाही. मात्र याहून अधिक काळ असं करू नका.