प्रश्नोत्तरेDilevary nantar kiti divasane sex karne yogy

1 उत्तर

सामान्यतः प्रसूती/डीलीवरी नंतर चार ते सहा आठवड्याच्या कालावधीनंतर लैंगिक संबंध पूर्ववत चालू करण्यात काहीही अडचण नसते. प्रसुतीनंतर सेक्स करताना प्रसूती कोणत्या प्रकारची होती नॉर्मल की सिझेरिअन, प्रसुतीदरम्यान किती टाके पडले, काही अडचणी किंवा धोके होते का इ. गोष्टींचा विचार करावा. प्रसुतीदरम्यान काही अडचणी आल्या असतील तर मात्र सेक्स सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. विशेषतः बाळंतपणातून नुकतीच गेलेल्या स्त्रीची शारीरिक आणि मानसिक तयारी आणि इच्छा महत्वाची. मात्र लगेचची गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य गर्भ निरोधक वापरणं गरजेचं आहे. दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवणं स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसंच कुटुंब नियोजनाच्या दृष्टीनेही गर्भ निरोधन फायद्याचं आहे.  बाळंतपणानंतर सेक्स किती दिवसांनी करावा हे बाळाच्या आईची शारीरिक आणि मानसिक तयारी आहे का याचा विचार करून ठरवणे जास्त रास्त होईल. दरम्यानच्या काळात तुम्ही तुमचे नाते भावनिकदृष्ट्या आणि इतर मार्गांनी मजबूत करू शकता.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 17 =