प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथुनाचे तोटे

tumhi masturbation che fayde tr sangitle pn disadvantages kay ahet??

plz tell us

1 उत्तर

कधी तरी मनात इच्छा झाली म्हणून हस्तमैथुन केलं तर त्याचे तोटे होत नाहीत. मात्र दुसरं काहीच न करता फक्त हस्तमैथुन करत राहिलं तर मात्र त्याचे तोटे होऊ शकतात.

  1. दुसऱ्या कशातच लक्ष लागत नाही. सतत मनात फक्त हस्तमैथुन आणि त्यातून मिळणाऱ्या लैंगिक आनंदाचाच विचार येत राहतो.
  2. हस्तमैथुन करताना जर इतर काही साहित्य, उपकरणं वापरली तर त्यातून शरीराला, लिंगाला इजा होऊ शकते.
  3. हस्तमैथुन करताना ज्या कृती केल्या जातात त्या प्रत्यक्षात तशाच आपल्या जोडीदारासोबत करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण तसं होईलच असं नाही त्यामुळे नैराश्य येऊ शकतं. 
  4. असाही विचार करून पहा…लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जोडीदाराची आवश्यकता असते. त्यामुळे जोडीदार नसेल तर लैंगिक भावनांना आवर घालावा लागतो आणि आपलं मन तसं करायला शिकतं. पण हस्तमैथुनाचा अतिरेक झाला तर मात्र लैंगिक भावनांना आवर घालण्याची क्षमताच हळू हळू कमी होऊ शकते.

त्यामुळे अति तिथे माती हे लक्षात घेतलं तर बरंच काही कळून येईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 17 =