असं काहीही नसतं. हा गैरसमज आहे. किशोरावस्थेत हस्तमैथुन केल्याने किंवा रात्री झोपेत वीर्यपतन होणे/ वीर्य गळणे अगदी स्वाभाविक आहे. यामुळे शुक्राणू कमी होत नाही किंवा वीर्य संपत नाही.
पुरुषाच्या शरीरात हृदयाच्या एका ठोक्याला हजारो पुरुष बीजं म्हणजेच शुक्राणू तयार होत असतात. ती बाहेर पडण्यासाठी वीर्यकोषांमध्ये वीर्य तयार होतं. लैंगिक भावना निर्माण झाल्या किंवा लैंगिक क्रिया केल्यावर ते लिंगातून बाहेर पडतं आणि नव्याने वीर्य तयार होतं. वीर्य सतत तयार होत असतं आणि ते साठवून ठेवता येत नाही.
आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुन, रात्री झोपेत वीर्यपतन होणे, वीर्यपतन याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ती ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/