‘गे’ शब्दाचा खरा अर्थ समलिंगी असा होत असला तरी ‘गे’ हा शब्द मुख्यतः समलिंगी पुरुषांसाठी वापरला जातो. समलिंगी स्त्रीयांसाठी ‘लेस्बियन’ हा शब्द प्रचलित आहे. समलिंगी लैंगिक संबंधामध्ये एकमेकांचं हस्तमैथुन करुन, गुदमैथुन करुन मुखमैथुन किंवा कृत्रिम लिंग वापरुन लैंगिक सुखाचा आनंद घेतात. समलिंगी संबंधामध्ये एखादा जोडीदार ‘रिसेप्टिव्ह'(स्वीकृत) तर दुसरा ‘इन्सर्टिव्ह’ भूमिका घेतो. कोणाला कोणती भूमिका घ्यायची इच्छा होते हे त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांवर, मूडवर किंवा जोडीदारावर अवलंबून असतं.
Gay sex मध्ये गुदामैथुन कितपत योग्य आहे? जंतूसंसर्गाची शक्यता तर नाही ना?
गुदामैथुन करण्यामध्ये अयोग्य असं काही नाही. मात्र काळजी घेणं आवश्यक आहे. जसं तुम्ही म्ह्टला आहात त्याप्रमाणे जंतूसंसर्गाची लागण होवू नये म्हणून निरोधचा वापर नक्की करता येईल. शिवाय गुदामैथुन करताना योग्य वंगणांचा वापर करणं फायदेशीर राहतं.