गर्भधारणेनंतर मासिक पाळी येत नाही. पाळी चुकणे हेच गर्भधारणा झाली किंवा दिवस गेले याचे लक्षण आहे. कारण जे रक्त मासिक पाळीवाटे बाहेर पडत होतं त्या रक्तावर आता गर्भाचं पोषण होत असतं. गर्भधारणा झाल्यानंतर जर रक्तस्त्राव होत असेल तर ते नक्कीच माता आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक आहे यासाठी तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाशयमुख आपोआप बंद होते व बाळंतपण होईपर्यंत त्यातून कोणत्याही प्रकारचा स्त्राव बाहेर येत नाही. बाळंतपण झाल्यावर पाळीचं चक्र हळू हळू पूर्वपदावर यायला लागतं.
गर्भधारणा नक्की कशी होते आणि बाळंतपणानंतर मासिक पाळी कधी येते याविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक पाहा.