पेनिस साईझ वाढविण्याचा कोणताही नैसर्गिक, वैद्यकीय किंवा इतर कोणताही शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध झालेला उपाय अस्तित्वात नाही. मुळात पेनिस साईझ/ लिंगाचा आकार का वाढवायचा? प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ६ ते १३ सेंटीमीटर (३-४ इंच) लांब असतं तर ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. साधारणपणे लिंगाची लांबी १२ सेंटीमीटर असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. लिंग वाकडं असणं, तिरकं असणं, डाव्या किंवा उजव्या बाजुला झुकलेलं असणं हे सर्व अगदी ‘नॉर्मल’ आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/