प्रश्नोत्तरेCategory: Public Questionshypospadies असलेल्या पुरुषास संतान प्राप्ती होते का

2 उत्तर

पहिल्यांदा हायपोस्पेडीया म्हणजे काय, हे समजून घेऊयात. शिस्नमुंडाच्या टोकाला लाघवी व वीर्य बाहेर सोडण्यासाठी एक छिद्र असतं. क्वचित वेळा हे छिद्र लिंगाच्या टोकाला नसून अलीकडे लिंगाच्या खालच्या भागाला असू शकतं. याला ‘हायपोस्पेडिया’ म्हणतात. हे छिद्र लिंगाच्या टोकापासून ते लिंगाच्या देठापर्यंतच्या भागात कुठेही असू शकतं. या छिद्रातून शरीराच्या बाहेर वीर्य येत असल्याने, हे छिद्र नेमकं कुठं आहे यावर गर्भधारणा होण्यासंबंधित समस्या अवलंबून असतात.

हायपोस्पेडीया असणाऱ्या पुरुषांपैकी काही पुरुषांच्या लिंगाला बराच बाकदेखील दिसतो. हे छिद्र कुठे आहे यावर हा बाक अवलंबून असतो. हायपोस्पेडीया असणाऱ्या पुरुषांचे अंडकोष इतरांसारखे खाली लोंबत/उतरत नाही त्यामुळे देखील गर्भधारणेमध्ये अडचण येऊ शकते.

हायपोस्पेडीया असणाऱ्या पुरुषांमध्ये वीर्यनिर्मिती व पुरुषबीजनिर्मिती यामध्ये अडचण नसते. या समस्येवर जाणकार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सामान्यतः हायपोस्पेडीया असणाऱ्या पुरुषांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. हे छिद्र बंद करून शिस्नमुंडापर्यंत मुत्रमार्ग वाढवून हे छिद्र शिस्नमुंडाच्या टोकाशी बनवलं जातं.

ही शस्त्रक्रिया मोठ्या वयाच्या पुरुषांची देखील होऊ शकते पण लहान वयात ही शस्त्रक्रिया झाली तर अधिक चांगले. काही शस्त्रक्रिया सोप्या तर काही अवघड असू शकतात. हे सर्वस्वी छिद्र नेमकं कुठं आहे यावर अवलंबून असतं.

डॉक्टरांच्या उपचारांनंतर किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुरुषास संतानप्राप्ती होऊ शकते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 14 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी