तुमच्या वयात हे प्रश्न पडणं अगदीच स्वाभाविक आहे. विषम लिंगी किंवा समलिंगी किंवा दोन्ही लिंगांच्या व्यक्तींसाठी आकर्षण वाटणं हे ही स्वाभाविकच आहे. त्यामुळे एक म्हणजे चिंता नको. माझा सल्ला असेल स्वतःला आणखी वेळ द्या. तुम्हाला जी मैत्रीण आवडते तिलाही जर तुम्ही आवडत असाल तर तुम्ही पुढे जा. आणि पहा. कुठल्यातरी निष्कर्षाला येण्याची घाई करण्याची आत्ता तरी आवश्यकता नाही. तुम्हाला स्वतःलाच समजेल तुमचा लैंगिक कल. आणि लैंगिक कल काहीही असला तरी काळजी करू नका. समलैंगिकता स्वीकारायला आपला समाज आजही तयार नसला तरी अनेक संस्था, व्यक्ती आपल्याच समाजात आहेत.
अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक्स वर क्लिक करा..
https://letstalksexuality.com/category/its-perfectly-normal/