I want to stop all this... asked 8 years ago

14 mulin sobat maja physical relationship hota , currently pan chalu aahe , but hey sagla stop karycha aahe mala , few months control hotat ya gosti but nantor restart hotat , kahi muli emotionally attached aahet so tyna nahi bolu shakat nahi, but mala hey stop karycha aahe

1 उत्तर
Answer for Stoping answered 8 years ago

मित्रा, तुझ्या आयुष्यात हे सगळं खरंच होतंय का ही एक फॅण्टसी आहे? आणि खरं असेल तर रागवू नकोस, पण तुझं सेक्स लाइफ जरा जास्तच अॅक्टिव्ह आहे असं आम्हाला वाटतं. अरे, एका वेळी १४ मुलींसोबत सेक्स केल्यावर आरोग्याला असणाऱ्या धोक्याची तुला कल्पना आहे आहे का? तुझे आणि या सगळ्या मुलींचे आरोग्य धोक्यात आहे त्यामुळे तू हे सर्व जसं शक्य आहे तसं थांबवावंस असं वाटतं. आणि तुलाही हे तसंच वाटतंय असं तू म्हणतो आहेस ही चांगली गोष्ट. तसा तू प्रयत्न पण करून पाहतोस हेही उत्तम. एकाहून अधिक जोडीदार असावेत का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र असे संबंध ठेवताना त्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्याला असलेला धोका मात्र कुणी लक्षात घेत नाही. 
प्रेम, जवळीक, आपलेपणा, आकर्षण व्यक्त करण्यासाठी सेक्सच करायला पाहिजे असं काही नाही. अनेक प्रकारे ही जवळीक व्यक्त करता येते. ज्या मैत्रिणी इमोशनली अटॅच्ड आहेत त्यांच्यासोबत तू असं नातं टिकवून ठेवू शकतोस. मात्र इतर मुलींना तू ठामपणे नकार द्यायला हवास आणि स्वतः असे संबंध सुरू करणं टाळायला हवंस. अन्यथा तुमचं सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे सर्वात आधी डॉक्टरांकडून पूर्ण शारीरिक तपासणी करून घे आणि तुझ्या मैत्रिणींनाही हाच सल्ला दे. सेक्स कंट्रोल होत नसेल तर सेक्सॉलॉजिस्टना जाऊन त्यांचा सल्लाही घेऊ शकतोस. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधू शकशील.
प्लीज टेक अ ब्रेक. इतर काही आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमव. अभ्यास, काम, छंद जोपास. सेक्स ही आनंददायी गोष्ट आहे मात्र त्याच्या आहारी जाऊ नकोस.
ऑल द बेस्ट!

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 9 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी