hi mi roshni mla as vicharaych ahe ki mla 3 boyfrd hote tighansobt sex kela ahe but safty used keli hoti prtelweli. bt yatlya ekane ekda safty nahi ghetli n sex kel. n flow attmdhe nahi kel. jewa flow honar hot tewa baher kadhun flow kel. bt aga maz lgn thrl ahe. ani jar nwryane without safety kel tr eds honyachi shkyta ahe ka
एड्स होण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे असुरक्षित शारीरिक संबंध. जर समोरील व्यक्ती एच.आय.व्ही. बाधित असेल आणि तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवताना काळजी घेतली नाही तर समोरील व्यक्तीला त्याची लागण होण्याची शक्यता वाढते. संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी जर वीर्य योनीबाहेर बाहेर पाडले तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. त्यामुळे जर ज्या व्यक्तीसोबत असुरक्षित संबंध आले त्या व्यक्तीला एड्स असेल तर एच. आय. व्ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकदा टेस्ट करून घेणे कधीही चांगले. आजार आहे की नाही याची खात्री करून घ्या. हे रक्ताच्या चाचणीतून कळू शकेल. एलायझा या चाचणीची किंमत कमी असल्याने मुख्यतः याच चाचणीचा वापर केला जातो. या चाचणीची मर्यादा अशी की, एच. आय. व्ही झाल्यावर तीन महिन्याच्या आत ही चाचणी केली, तर ती बिनचूक उत्तरं देईलच असं नाही. म्हणूनच या तीन महिन्यांना ‘गवाक्ष काळ’ (विंडो पिरिअड) म्हणतात. म्हणून ही चाचणी आणखी तीन महिन्यांनी पुन्हा एकदा करावी लागते. जर चाचणी दोन्ही वेळा निगेटिव्ह आली तर चिंता करण्याचे कारण नाही.
आता वळूयात तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तुम्ही आणि तुमची होणारा जीवनसाथी दोघांनाही एड्स नसेल तर असुरक्षित संबंध (कंडोम शिवाय) आले तरीही लैंगिक संबंधांतून एच. आय. व्ही. होण्याची शक्यता नाही. मात्र जर गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे आवश्यक आहे.
आपल्या वेबसाईटवर गर्भधारणा आणि एच. आय. व्ही. वर विचारले गेलेले अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. https://letstalksexuality.com/question/.
शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, मनातील शंका काढण्यासाठी एकदा टेस्ट अवश्य करा. तुमचे आणखी काही प्रश्न किंवा शंका असतील तर नक्की विचारा.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला 9545555670 या मोबाईलवर (१० ते ६ या वेळात) आणि tathapi@gmail.com या ई मेल जरूर पाठवा.