प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMaze lingat sex karatana kadak pana janvat nahi

Maze lingat  sex karatana kadak pana janvat nahi maze mi 23 varshacha ahe mala cigaret pinyache vasan ahe plase upay sanga

1 उत्तर
Answer for information of sex answered 8 years ago

पहिलं आपण हे समजून घेऊ या की पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो किंवा लिंग कडक होते  म्हणजे काय होतं. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मन:स्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे लिंगाचा ताठरपणा वाढवण्यासाठी लिंगाला होणारा रक्त पुरवठा वाढणं आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा पोषक आहार आणि व्यायाम उपयोगी पडू शकतो. लिंगामध्ये ताठरपणा कमी वाटत असेल तर त्यासाठी आहार सुधारायला पाहिजे. चांगला आहार, व्यायाम आणि चिंतामुक्त जीवनशैली शरीराचं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आवश्यक आहे. रक्ताभिसरण सुधारलं की लिंगाचा ताठरपणाही वाढतो. संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते. याविषयी सविस्तर माहितीसाठी  पुढील लिंकवर क्लिक करून लेख वाचा.
https://letstalksexuality.com/premature-ejaculation/

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 20 =