प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलैंगिक संबंधाचा सामान्य कालावधी किती मिनिट असतो? किती मिनिटांत स्त्री समाधानी होऊ शकते? स्त्रिला सेक्सबद्दलच्या अपेक्षा काय असतात?

1 उत्तर
Answer for About intercourse answered 6 years ago

प्रत्येक स्त्री-पुरुषाचा संभोग करण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. दुसयासोबत तुलना करणं चुकीचं ठरेल. दोन्हीही जोडीदारांच्या उत्कटेच्या पातळीवर संभोग क्रियेचा कालावधी अवलंबून असतो. अनेकवेळा संभोगाचा अर्थ फक्त लिंग योनीमध्ये टाकणं एवढाच घेतला जातो. खरतरं संभोगापूर्वीचा प्रणय देखील तितकाच महत्वाचा असतो. पण याकडं बऱ्याचवेळा दुर्लक्ष केलं जातं. पॉर्न क्लिपमधून दाखवलेला जास्त कालावधीचा संभोग हा कृत्रिम असतो. पण अशा जास्त वेळ चालणाऱ्या संभोगाच्या क्लिप्स पाहून मनामध्ये न्यूनगंड तयार होतो. याला छेद देणं आवश्यक आहे.

तुमच्या प्रश्नाचं उत्तरही वरील प्रमाणेच आहे म्हणजे प्रत्येक स्त्री-पुरुषाचा संभोग करण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो.

तुम्ही तिसरा प्रश्न विचारला याबद्दल तुमचं अभिनंदन!! कारण महिलेच्याही सेक्सबद्दलच्या काही अपेक्षा आपल्याकडे असतात हे खूप कमी पुरुष विचारात घेतात. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडुनच मिळणार आहे. कारण प्रत्येकाच्या सेक्सबद्दलच्या अपेक्षा व दृष्टिकोन ह्या इतरांपेक्षा वेगवेगळ्या असतात अन त्या कळतील निवांत वेळ व मनमोकळ्या संवादातुन. तेव्हा एकमेकांना वेळ द्या अन एकमेकाला समजुन उमजुन छान आयुष्य जगा, तुम्हाला शुभेच्छा….

अधिक माहितीसाठी पुढील लिंक नक्की पहा.

https://letstalksexuality.com/foreplay/

https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 20 =